पोस्ट्स

इमेज
  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज , माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय , माळवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सेवा रुग्णालय , कसबा बावडा कोल्हापूर येथील समुपदेशक उदय माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक डॉ.बी.एन. रावण , माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.टी.के.पाटील , सौ. सीमा पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मानसशास्त्र विभाग प्रमुख जगदिश सरदेसाई यांनी केले तर आभार डॉ.एन.डी.मांगोरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक , कर्मचारी , विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
इमेज
  One day State Level Workshop on Research Methodology held on 15th October 2024 श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँण्ड   सायन्स कॉलेज , माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष , संशोधन समिती व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ' संशोधन पद्धती ' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डी.आर.के. कॉलेज , कागल येथील डॉ.अमोल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण , ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. कांबळे म्हणाले , संशोधन हि एक वैकासिक प्रक्रिया आहे. मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी संशोधनाची नितांत गरज आहे. संशोधनाने व्यक्तीचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते. संशोधन करणे   म्हणजे नवनिर्मितीला चालना देणे होय. आपला बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी   संशोधनाकडे वळाव...

छत्रपती शाहू महाराज जयंती

इमेज
  मानसशास्त्र विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. एस. एस. कुरलीकर सोबत श्री.ए.आर. महाजन, मा.शिवाजीराव पाटील, श्रीमती टी.के. पाटील, डॉ.उषा पवार, डॉ.एन.डी.मांगोरे भारतात अनेक राजे होऊन गेले मात्र समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे राजे छत्रपती शाहू महाराज होते.आपला  समाज शिक्षणामुळे पाठीमागे आहे हे ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक जातीच्या वस्तीगृहाची निर्मिती केली. शेती सिंचनासाठी राधानगरी धरणाची निर्मिती, विज्ञानवादी दृष्टिकोन, सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे हे विचार समाजाला दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन समाजशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. एस. कुरलीकर यांनी केले. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मानसशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाह...

Mindfullness

https://www.psychologywayofpositivelife.com/2023/07/mindfulness.html  
इमेज
  आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज : श्री. उदय माने आत्महत्या सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. उदय माने सोबत मा. शिवाजीराव पाटील , डॉ. श्रीमती व्ही.पी. पाटील ,             डॉ. बी. एन. रावण , डॉ. एस. एस. कांबळे , श्री. जे.ए. सरदेसाई , डॉ. एन. डी. मांगोरे जागतिक पातळीवर आत्महत्या हा विषय चिंताजनक बनत चालला आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्ये बरोबरच विद्यार्थी आत्महत्या वाढताना दिसत आहेत. विद्यार्थी अभ्यास , परीक्षेतील अपयश , बेरोजगारी , उदासीनता , मानसिक दुर्बलता या कारणांमुळे आत्महत्येस प्रवृत्त होताना दिसत आहे. अशा विद्यार्थ्यांना वेळीच ओळखून त्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे गरजेचे आहे . आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज असते असे प्रतिपादन समुपदेशक श्री. उदय माने यांनी केले. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज , माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंध दिन...
इमेज
  छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला : डॉ. शिरीष शितोळे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. शिरीष शितोळे , डॉ. सुरेश संकपाळ , प्रा.हरिदास ढोके , डॉ. श्रीमती व्ही. पी .पाटील , प्रा. जगदीश सरदेसाई , डॉ. एन. डी. मांगोरे , प्रा . दत्तात्रय नाईक व मान्यवर.   कोल्हापूर जिल्हा समृद्ध व निसर्ग रम्य आहे याचे श्रेय कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जाते कारण जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखे धरण बांधून मुबलक पाण्याची सुविधा निर्माण केली . देशात पहिला जिल्हा असेल जिथं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहांची स्थापना केली . या सर्व कार्यातून त्यांनी सामाजिक सुधारणा घडवून आणली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा असे मत यावेळी डॉ. शिरीष शितोळे यांनी मांडले.                 त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला . कलेवर असणारे छत्रपती शाहू महाराजांचे प्रेम याबद्दल सा...

Social Psychology

Social Psychology