आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज : श्री. उदय माने

आत्महत्या सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. उदय माने सोबत मा. शिवाजीराव पाटील, डॉ. श्रीमती व्ही.पी. पाटील,            डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कांबळे, श्री. जे.ए. सरदेसाई, डॉ. एन. डी. मांगोरे

जागतिक पातळीवर आत्महत्या हा विषय चिंताजनक बनत चालला आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्ये बरोबरच विद्यार्थी आत्महत्या वाढताना दिसत आहेत. विद्यार्थी अभ्यास, परीक्षेतील अपयश, बेरोजगारी, उदासीनता, मानसिक दुर्बलता या कारणांमुळे आत्महत्येस प्रवृत्त होताना दिसत आहे. अशा विद्यार्थ्यांना वेळीच ओळखून त्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे गरजेचे आहे. आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज असते असे प्रतिपादन समुपदेशक श्री. उदय माने यांनी केले.

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त 'आत्महत्या सामाजिक समस्या'या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. उदय माने बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही.पी. पाटील होत्या.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून संस्था सचिव मा. शिवाजीराव पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी. एन. रावण, ऍक्टिव्हिटी प्रमुख श्री. एस. एस. कांबळे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मानसशास्त्र विभाग प्रमुख श्री. जे. ए. सरदेसाई यांनी केले तर आभार डॉ. एन. डी. मांगोरे यांनी मानले.

कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

छत्रपती शाहू महाराज जयंती