छत्रपती शाहू महाराज जयंती

 मानसशास्त्र विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. एस. एस. कुरलीकर सोबत श्री.ए.आर. महाजन, मा.शिवाजीराव पाटील, श्रीमती टी.के. पाटील, डॉ.उषा पवार, डॉ.एन.डी.मांगोरे

भारतात अनेक राजे होऊन गेले मात्र समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे राजे छत्रपती शाहू महाराज होते.आपला

 समाज शिक्षणामुळे पाठीमागे आहे हे ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक जातीच्या वस्तीगृहाची निर्मिती केली. शेती सिंचनासाठी राधानगरी धरणाची निर्मिती, विज्ञानवादी दृष्टिकोन, सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे हे विचार समाजाला दिशादर्शक आहेत

असे प्रतिपादन समाजशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. एस. कुरलीकर यांनी केले.

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मानसशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एस. एस. कुरलीकर बोलत होते.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

डॉ . अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy )