पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज : श्री. उदय माने आत्महत्या सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. उदय माने सोबत मा. शिवाजीराव पाटील , डॉ. श्रीमती व्ही.पी. पाटील ,             डॉ. बी. एन. रावण , डॉ. एस. एस. कांबळे , श्री. जे.ए. सरदेसाई , डॉ. एन. डी. मांगोरे जागतिक पातळीवर आत्महत्या हा विषय चिंताजनक बनत चालला आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्ये बरोबरच विद्यार्थी आत्महत्या वाढताना दिसत आहेत. विद्यार्थी अभ्यास , परीक्षेतील अपयश , बेरोजगारी , उदासीनता , मानसिक दुर्बलता या कारणांमुळे आत्महत्येस प्रवृत्त होताना दिसत आहे. अशा विद्यार्थ्यांना वेळीच ओळखून त्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे गरजेचे आहे . आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक व सामाजिक आधाराची गरज असते असे प्रतिपादन समुपदेशक श्री. उदय माने यांनी केले. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज , माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त ' आत्महत्या सामाजिक समस्या ' या विषयावर आय