पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ . अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy )

 डॉ . अल्बर्ट एलिस अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy ) हा त्यांचा मानवी मनाचा सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांच्या लहानपणीच  झाली होती. भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे व दाखले दिले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगता येतील. १) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून पहातो आणि त्या घटनाक्रमांचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो. २) माणसाला वाटणा

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

इमेज
भावनिक बुद्धिमत्ता | Emotional Intelligence | भावनिक बुद्धिमत्ता सुधारता येते का?                     भावनिक बुद्धिमत्ता ( Emotional Intelligence ) आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ,  ज्या अतिशय बुद्धिमान व हुशार असतात ,  पण आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. अशा विविध घटनांमधून आपणास हे दिसून येते की , ‘ बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे सूत्र हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. भावनिक बुद्धिमत्ता अभ्यासाचे मूळ आपणास डार्विनच्या सिद्धांतामध्ये आढळून येते. भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक असते असे डार्वनिने सर्वप्रथम मांडले होते. अनेक अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की ,  केवळ बुद्धिमत्ता तपासून एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही तर त्यासाठी आणखीन काही गोष्टी