छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला : डॉ. शिरीष शितोळे

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. शिरीष शितोळे,डॉ. सुरेश संकपाळ, प्रा.हरिदास ढोके , डॉ. श्रीमती व्ही. पी .पाटील, प्रा. जगदीश सरदेसाई, डॉ. एन. डी. मांगोरे,प्रा . दत्तात्रय नाईक व मान्यवर.

 

कोल्हापूर जिल्हा समृद्ध व निसर्ग रम्य आहे याचे श्रेय कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जाते कारण जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखे धरण बांधून मुबलक पाण्याची सुविधा निर्माण केली. देशात पहिला जिल्हा असेल जिथं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहांची स्थापना केली. या सर्व कार्यातून त्यांनी सामाजिक सुधारणा घडवून आणली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा असे मत यावेळी डॉ. शिरीष शितोळे यांनी मांडले.

               त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला. कलेवर असणारे छत्रपती शाहू महाराजांचे प्रेम याबद्दल सांगताना म्हणाले की, चित्रकलेच्या इंटरशीपसाठी अनेक देशातून लोक आजही कोल्हापुरात येतात. हे बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही इतके मोठे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे असे प्रतिपादन महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील मानसशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिरीष शितोळे यांनी व्यक्त केले.

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील सांस्कृतिक विभाग व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी               डॉ. शिरीष शितोळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील होत्या.

  कार्यक्रमावेळी उपस्थित पाहुण्यांना विभागामार्फत  'अंकुर' हा काव्यसंग्रह व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

               यावेळी  महावीर महाविद्यालयाचे डॉ. शिरीष शितोळे सरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील डॉ. सुरेश संकपाळ होते.

कार्यक्रमास सर्व शिक्षक ,कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. जगदीश सरदेसाई यांनी केले, डॉ. एन. डी. मांगोरे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

छत्रपती शाहू महाराज जयंती