One day State Level Workshop on Research Methodology held on 15th October 2024
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी -
कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधन समिती व
मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'संशोधन पद्धती' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात
आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन डी.आर.के. कॉलेज, कागल येथील डॉ.अमोल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील
होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव
पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण,ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, संशोधन हि एक वैकासिक प्रक्रिया आहे. मानवी जीवनाचा विकास
साधण्यासाठी संशोधनाची नितांत गरज आहे. संशोधनाने व्यक्तीचा बौद्धिक विकास होण्यास
मदत होते. संशोधन करणे म्हणजे
नवनिर्मितीला चालना देणे होय. आपला बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणण्यासाठी
विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे असे
आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात संशोधन प्रस्ताव या विषयावर
आय.सी.आर.ई.एस.एम.व्ही.गारगोटी येथील संगणक विभागातील माजी विभाग प्रमुख सुहास
आळतेकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या व्दितीय सत्रात संशोधन पद्धती या विषयावर
संजीवनी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे डीन डॉ.अनुप मुळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. जे.ए.सरदेसाई
यांनी केले आभार डॉ.एन.डी.मांगोरे यांनी
मांडले.
कार्यक्रमास
सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी
उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा