विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व
मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय, माळवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सेवा
रुग्णालय, कसबा बावडा कोल्हापूर येथील समुपदेशक उदय माने यांच्या
हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव
पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक डॉ.बी.एन.
रावण, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.टी.के.पाटील,सौ. सीमा पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मानसशास्त्र विभाग प्रमुख जगदिश सरदेसाई यांनी केले तर आभार डॉ.एन.डी.मांगोरे यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी
उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा