भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence
भावनिक बुद्धिमत्ता | Emotional Intelligence | भावनिक बुद्धिमत्ता सुधारता येते का? भावनिक बुद्धिमत्ता ( Emotional Intelligence ) आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो , ज्या अतिशय बुद्धिमान व हुशार असतात , पण आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. अशा विविध घटनांमधून आपणास हे दिसून येते की , ‘ बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे सूत्र हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. भावनिक बुद्धिमत्ता अभ्यासाचे मूळ आपणास डार्विनच्या सिद्धांतामध्ये आढळून येते. भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक असते असे डार्वनिने सर्वप्रथम मांडले होते. अनेक अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की , केवळ बुद्धिमत्ता तपासून एखाद्या व्यक्तीच्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा