डॉ . अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy )
डॉ . अल्बर्ट एलिस अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy ) हा त्यांचा मानवी मनाचा सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांच्या लहानपणीच झाली होती. भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे व दाखले दिले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगता येतील. १) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून पहातो आणि त्या घटनाक्रमांचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो. २)...